आदित्य ठाकरेंच्या ओपन जिमला १५ दिवसांत 'तडे'!

 युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मरीन ड्राइव्ह इथं लावलेल्या ओपन जिमला तडे गेले आहेत. अवघ्या १५ दिवसांत ठाकरेंचा फिटनेस ढेपाळलेला दिसतोय.

Updated: Aug 9, 2015, 12:18 PM IST
आदित्य ठाकरेंच्या ओपन जिमला १५ दिवसांत 'तडे'! title=

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई:  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मरीन ड्राइव्ह इथं लावलेल्या ओपन जिमला तडे गेले आहेत. अवघ्या १५ दिवसांत ठाकरेंचा फिटनेस ढेपाळलेला दिसतोय.

१५ दिवसांपूर्वी या ओपन जिमचं उद्घाटन झालं होतं. पोलीस जिमखान्यासमोर उभारण्यात आलेल्या या ओपन जिमवरून शिवसेना आणि नितेश राणेंच्या स्वाभिमानी संघटनेत चांगलाच वाद निर्माण झाला. 

ओपन जिमच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत जिम काढून टाकला होता. नंतर तो पुन्हा बसवण्यात आला. महापालिकेनं त्या जिमला परवानगी दिली. मात्र त्याविरोधात स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष काँग्रेस आमदार नितेश राणेनं हायकोर्टात याचिका दाखल केलीय.

ओपन जिमबाबत निर्णय घेण्यासाठी कोर्टानं तीन सदस्यीय समिती नेमलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.