मालवणी दारू प्रकरणी आरोपी भारत पटेलला गुजरातमधून अटक

मालवणीतल्या बनावट दारू प्रकरणातील 14 वा आरोपी भारत पटेल याला मुंबई पोलिसांनी अहमदाबादमधून अटक केलीय. त्याला आज मुंबईत आणलं जाणार आहे.

Updated: Aug 6, 2015, 10:11 AM IST
मालवणी दारू प्रकरणी आरोपी भारत पटेलला गुजरातमधून अटक title=

मुंबई: मालवणीतल्या बनावट दारू प्रकरणातील 14 वा आरोपी भारत पटेल याला मुंबई पोलिसांनी अहमदाबादमधून अटक केलीय. त्याला आज मुंबईत आणलं जाणार आहे.

भारत पटेल ट्रक चालक आणि टँकर चालकांकडून अवैधरित्या रसायनं खरेदी करून दारू भट्ट्यांना पुरवत असे. 

डीसीपी धनंजय कुलकर्णी यांनी सांगितल्यानुसार मुंबई क्राइम ब्रांचने याप्रकरणी अहमदाबाद पोलिसांना माहिती दिली होती. अहमदाबाद पोलिसांना आरोपीची जागा सांगण्यात आली, त्यानंतर अहमदाबादच्या चाँद लोधिया परिसरातून त्याला अटक करण्यात आली. 

आज स्थानिक कोर्टात पटेलला हजर करण्यात येणार असून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. भारत पटेल याच्या अटकेनंतर आता अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 14 झाली आहे. 

मालवणीत विषारी दारू पिऊन 102 जणांचा मृत्यू झाला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.