वांद्रे-वरळी सी लिंकवर गाडी उलटली आणि...

दारु पिऊन भरधाव गाडी चालवण्याच्या नादात बांद्रा वरळी सी-लिंकवर एका तरुणाचे प्राण थोडक्यात बचावले. 

Updated: Mar 10, 2017, 03:46 PM IST
वांद्रे-वरळी सी लिंकवर गाडी उलटली आणि... title=

मुंबई : दारु पिऊन भरधाव गाडी चालवण्याच्या नादात बांद्रा वरळी सी-लिंकवर एका तरुणाचे प्राण थोडक्यात बचावले. 

रात्री दोनच्या सुमारास बर्थ डे पार्टी उरकून येताना तरुणानं सी-लिंकवरून वेगात प्रवास सुरू केला. आधीच दारुच्या अंमलाखाली असल्यानं तरुणाचा गाडीवरचा ताबा सुटला. 

भरधाव वेगात असलेली गाडी एकदा उलटून पुन्हा सरळ झाली आणि डिव्हायडरवर जाऊन आदळली.

सुदैवानं तरुणाला फारशी इजा झाली नाही... पण गाडीची परिस्थिती पाहिली, तर अपघात किती भीषण होता अंदाज येतो... 

गाडीतले सर्व जण या अपघातात बचावले असले तरी प्रत्येक वेळी असं होईलच असं नाही. तेव्हा दारू पिऊन गाडी चावणे टाळलेलंच बरं...