कृपाशंकर सिंह यांच्यासह कुटुंबावर आरोपपत्र दाखल

काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात अवैध संपत्तीबाबत मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. 

Updated: Apr 5, 2015, 10:14 AM IST
कृपाशंकर सिंह यांच्यासह कुटुंबावर आरोपपत्र दाखल title=

मुंबई: काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात अवैध संपत्तीबाबत मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. 

२२ फेब्रूवारी २०१२ साली कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात मुंबई उच्च न्यायालय दाखल याचिकेवर आधारीत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. यात कृपाशंकर सिंह यांच्यासह त्यांची पत्नी मालतीदेवी, मुलगा नरेंद्र, मुलगी सुनिता, जावई विजय प्रताप सिंह यांच्या नावावर २७४ कोटी रुपयांची संपत्ती जमवल्याचा आरोप करण्यात आलाय. 

तर कृपाशंकर सिंह आणि त्यांचा मुलागा नरेंद्र यांनी रिअल स्टेट मध्ये १४८ कोटी रुपयांची अपसंपदा जमा केल्याचा आरोप केलाय. संजय तिवारी नावाच्या एका व्यक्तीनं २०१० साली केलेल्या याचिकेच्या आधारे एसीबीनं आरोपपत्र दाखल केलं. 

विशेष तपास पथकानं न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात कृपाशंकर आाणि त्यांच्या कुटुंबीयांनी ज्ञात स्रोतापेक्षा १९.९५ टक्के इतकी जास्त मालमत्ता जमविल्याचा ठपका ठवण्यात आला आहे. 

- गैरमार्गाने बेहिशेबी मालमत्ता जमविण्याचे कटकारस्थान 
- भादंवि कलम १२०
- खोटी कागदपत्रे सादर करणे - कलम ४७१
- गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे - कलम १०९
- गुन्हा लपविण्यासाठी पुराव्यांची विल्हेवाट - कलम २०१
- भ्रष्टाचार प्रतिबंध (लोकसेवक) कायदा १९८८ अन्वये लाच घेणे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.