मध्य रेल्वेवर आज 9 तासांचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकात आज तब्बल 9 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Updated: Oct 23, 2016, 09:32 AM IST
मध्य रेल्वेवर आज 9 तासांचा मेगाब्लॉक title=

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकात आज तब्बल 9 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

या ब्लॉकदरम्यान दिवा स्थानकातील प्लॅटफॉर्मचे काम केले जाणार आहे. यामुळे कल्याण ते सीएसटी मार्गावरील फास्ट लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्यात. 

त्यासोबतच सिंहगड एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर रत्नागिरी-दादर-रत्नागिरी ट्रेन पनवेलपर्यंत धावणार आहे.

मध्य रेल्वेसोबतच हार्बर लाईनवरही  सीएसटी ते चुनाभट्टी, माहीम दरम्यान सकाळी साडेदहा ते साडेचार पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.