राज्यातील पहिल्या ५ ग्रामपंचायती झाल्या डिजिटल

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील पहिल्या ५ ग्रामपंचायती डिजिटल ग्रामपंचायती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. यात नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खंडाळा, कामाठी तालुक्यातील खसाळा आणि तरोडी, हिंगणा तालुक्यातील दाभा आणि नागपूर ग्रामीण भागातील विहिर गाव अशा पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

Updated: May 1, 2016, 11:18 PM IST
राज्यातील पहिल्या ५ ग्रामपंचायती झाल्या डिजिटल  title=

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील पहिल्या ५ ग्रामपंचायती डिजिटल ग्रामपंचायती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. यात नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खंडाळा, कामाठी तालुक्यातील खसाळा आणि तरोडी, हिंगणा तालुक्यातील दाभा आणि नागपूर ग्रामीण भागातील विहिर गाव अशा पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे या ग्रामपंचायतींचं उद्धाटन करण्यात आलं. त्यानंतर या पाचही ग्रामपंचायतीमधील नागरीक आणि विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कान्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या पाचही ग्रामपंचायती आता नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्यात आल्या असून 4MBPS क्षमतेची इंटरनेट सुविधा या गावांमध्ये सुरु करण्यात आलीये.

विषेश म्हणजे या गावांमध्ये शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातही वायफाय सुविधा उपलब्ध करण्यात आलीये. येत्या ऑगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्यातील सर्व 776 ग्रामपंचायती या डिजीडल ग्राम करत नागपूर जिल्हा देशातील पहिला डिजिटल जिल्हा बनवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. तर येत्या 3 वर्षात राज्यातील सर्व 28 हजार ग्रामपंचायती या डिजिटल ग्राम करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

पाहा व्हिडिओ