४८ तासात महाराष्ट्रात सर्वदूर मान्सून

येत्या ४८ तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची चिन्ह आहेत. काल केरळमध्ये दाखल झालेला मान्सून आज तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पोहोचलाय. 

Updated: Jun 9, 2016, 06:25 PM IST
४८ तासात महाराष्ट्रात सर्वदूर मान्सून   title=

मुंबई : येत्या ४८ तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची चिन्ह आहेत. काल केरळमध्ये दाखल झालेला मान्सून आज तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पोहोचलाय. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून उत्तरेच्या दिशेनं उत्तम प्रगती करतोय. आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगणा, आणि महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनपू्र्व पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. तिकडे पूर्वेकडील बंगाल आणि हिमालयाच्या पायथ्याशीही मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडतोय. दोन दिवसांपूर्वी मान्सून केरळमध्ये धडकल्यानंतर कोकणातही त्याची चाहूल लागलीय. या पावसामुळे वातावरणात सुखद असा गारवा निर्माण झालाय..पावसाच्या आगमनाने शेतकरी राजा सुखावलाय. शेतीच्या कामाची लगबग सुरू झालीय.