मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार 42 हजार धावपटू

14व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये 42 हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार आहेत.

Updated: Jan 14, 2017, 10:26 PM IST
मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार 42 हजार धावपटू title=

मुंबई : 14व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये 42 हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार आहेत. दरवर्षीप्रमाणं यंदाही आफ्रीकनं धावपटूंचंच मॅरेथॉनमध्ये वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, रियो ऑलिम्पिकमध्ये फायनल गाठणारी ललिता बाबर आणि नाशिकची कविता राऊत आपल्याला यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना दिसणार नाहीत.

खेतराम, मोहम्मद युनुस, ईलाम सिंग, अमनदिप कौर, मोनिका आथरे, ज्योती गावडे आणि स्यामली सिंगसारखे भारतीय धावपटू मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना आपल्याला दिसतील.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ही मॅरेथॉन पाच गटांमध्ये आयोजत करण्यात आलीय. तीन लाख 77हजार अमेरिकन डॉलर एवढं बक्षीस असणारी ही आशियातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणूनही ओळखली जाते. सेलिब्रिटींची उपस्थिती हे मुंबई मॅरेथॉनचं खास वैशिष्ट्य यंदाही आपल्याला पहायला मिळेल.