४१ वर्षांचे रिक्षाचालक देतायंत १० वीची परीक्षा

 शिक्षणाला कोणतीही सीमा नसते. माणूस हा आयुष्याच्या अखेरपर्यंत हा विद्यार्थी असतो असं म्हणतात. मुलुंड मधील शरीफ खान या  रिक्षाचालकाने हे विचार खरे ठरवत दहावीची परीक्षा देण्याचा निर्धार केला आहे.

Updated: Mar 7, 2017, 09:07 AM IST
४१ वर्षांचे रिक्षाचालक देतायंत १० वीची परीक्षा title=

मुंबई : शिक्षणाला कोणतीही सीमा नसते. माणूस हा आयुष्याच्या अखेरपर्यंत हा विद्यार्थी असतो असं म्हणतात. मुलुंड मधील शरीफ खान या  रिक्षाचालकाने हे विचार खरे ठरवत दहावीची परीक्षा देण्याचा निर्धार केला आहे.

दिवसभर रिक्षा चालवून आपल्या संसाराचा गाढा ओढताना आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा त्यांना होती. मुलगी रुकसाल खान हिने आपल्या पित्याची शिक्षणाची ओढ लक्षात घेऊन त्यांना दहावीच्या परीक्षेची तयारी करण्यास मार्गदर्शन केलं. रुकसाल आपला बारावीचा अभ्यास करता करता आपल्या वडिलांची उजळणी देखील घेते. दुपारच्या वेळी रिकाम्या वेळेत शरीफ कधीकधी रिक्षातच आपला अभ्यास करतात. वयाच्या ४१ व्या वर्षी दहावीची परीक्षा देतानाच उच्च शिक्षण घेऊन समाजात आपलं देखील स्थान तयार करण्याचा मानस शरीफ खान यांचा आहे.