ISISच्या जाळ्यात अडकले मुंबईतले तीन तरूण

Updated: Dec 21, 2015, 09:36 AM IST
ISISच्या जाळ्यात अडकले मुंबईतले तीन तरूण title=

मुंबई - मालाड मधल्या मालवणी भागातील तीन तरुण ISIS या दहशतवादी संघटनेत सामील झालेत. हे तरुण दोन महिन्यांपूर्वीच बेपत्ता झाले होते. आयाज सुल्तान, वाजिद शेख आणि मोहशीन शेख अशी या तिघांची नावं आहेत. 

यातील आयाज यानं घर सोडताना कुवेतमध्ये नोकरी करण्यासाठी जात असल्याचं कारण दिलं. मोहशीन शेखनं मित्राच्या लग्नाचं कारण दिलं तर वाजिद शेखनं आधार कार्डवरील नाव दुरुस्त करण्याच्या बहाण्यानं घर सोडलं. हे तीनही तरुण एकमेकांचे शेजारी आहेत आणि एकमेकांचे खास मित्र आहेत. त्यामुळे हे तिघेही एकत्रच आयसीसमध्ये दाखल झाले असावेत असा संशय एटीएसला  आहे.

मुंबईतले तरुण  ISISच्या मार्गावर जाण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी कल्याणमधील काही युवक आयसीसमध्ये भर्ती झाले होते.