मार्वे समुद्रकिनाऱ्यावर तीन जण बुडाले!

एक दुख:द घटना मार्वे या समुद्रकिनाऱ्यावर घडलीय. पोहायला गेलेल्या सात मित्रांपैकी तीन जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय.

Updated: Jul 1, 2013, 01:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रविवार हा वीकेण्ड डे आणि त्यात पावसाळ्याचे दिवस त्यामुळे ठिकठिकाणी फिरायला जाण्याची टूम निघते. विविध समुद्र, धबधबे, रिसॉर्ट लोकांना खुणावत असतात. दरवर्षी हजारो लोक पाण्याची मजा घेण्यासाठी जातात. पण काही वेळेला निसर्गाच्या चुकीने तर काही वेळेला स्वत:च्याच चुकीने जीव गमावून बसतात.
अशीच एक दुख:द घटना मार्वे या समुद्रकिनाऱ्यावर घडलीय. पोहायला गेलेल्या सात मित्रांपैकी तीन जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय. जीतू दत्ताराम पाष्टे (१४), शिवा अशोक गुप्ता (१२) आणि मयूर ज्ञानेश्वथर गायकवाड (१३) अशी त्या मुलांची नावे आहेत. पोहण्याची मजा घेण्यासाठी ते समुद्रात उतरले परंतु त्यांना पाण्याचा काही अंदाज आला नाही. त्याचवेळी आलेल्या एका मोठ्या लाटेने त्यांना समुद्रात खेचलं.

हे वृत्त कळताच नौदल आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत नौदल आणि अग्निशमन दलाचे जवान तसेच जीवरक्षक आणि पोलीसांचे त्यांचा शोध घेण्याचे काम चालू होते. या घटनेच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर लाईफ गार्ड नसल्याची तक्रार तेथील स्थानिक नागरिकांनी केलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.