मुंबई: (अमित जोशी, प्रतिनिधी) - बत्तीशी तोडण्याची भाषा करणाऱ्यांसाठी एक बातमी आहे. बुलढाण्याच्या एका 16 वर्षाच्या आसीक गवईच्या तोंडात नेहमीच्या 32 दातांव्यतिरिक्त एक नाही दोन नाही तर तब्बल 232 दात आढळून आले होते.
दोन वर्षांपासून त्याच्या दाढेकडच्या भागाला सूज येत होती. अखेर आसीकला मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयात तपासण्यात आलं असता त्याच्या दाढेकडच्या ठिकाणी तब्बल 232 अतिरिक्त दात आढळून आले. म्हणजे आसीकच्या तोंडात तब्बल 260 दात होते. त्यातील 232 दात आता काढण्यात आले.
दात काढण्यासाठी सहा तांसाची मॅरेथॉन शस्त्रक्रिया जे. जे.च्या डॉक्टरांना करावी लागली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून साधारण एक सेंटीमीटर लांबीचे सात तुकडे आणि असंख्य छोटे दात काढण्यात आले. काही दिवसांत हा तरुण सामान्य जीवन जगू शकेल आणि नेहमीप्रमाणे खाऊ शकेल असा विश्वास जे जे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.