मुंबई : पावसानं पाठ फिरवल्यामुळं मुंबईवर पाणी कपातीचं संकट अधिक गडद झाले आहे. आता मुंबईत आज रात्रीपासून २० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. तर व्यापाऱ्यांसाठी ५० टक्के पाणीकपात लागू असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
अधिक वाचा - पुण्यात पिण्याच्या पाण्यावरून तरुणाचा खून
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्यामुळं पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. त्यामुळं आज स्थायी समितीच्या बैठकीच २० टक्के पाणी कपातीचा निर्णय झाला.
अधिक वाचा - पावसाची दांडी; 'पाणी... पाणी' करण्याची वेळ येणार?
व्यावसायिक वापरासाठीच्या पाण्याची कपात आजपासूनच लागू झाली आहे. मॉल, हॉटेल, रेसकोर्स यांना ५० टक्के पाणीकपात लागू असणार आहे. तर घरगुती वापराच्या पाण्याची २० टक्के कपात लागू करण्यात आलेय. सध्या ८ महिने पुरेल एवढाच पाणी धरणांमध्ये शिल्लक आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.