मुंबई : गुजरात पाटीदार पटेल समाजाच्या आंदोलनाने पेटलाय. हिंसा वाढल्याने तेथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पटेल समाज आपल्या मागण्यांसाठी जसा एकत्र आला. त्यांचे कौतुक आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पाटील यांनी एकत्र यावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलेय.
अधिक वाचा - राज ठाकरे यांनी घेतली नारायण राणेंची भेट
काँग्रेस नेते नारायण राणे लातूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या आधी त्यांनी पाटील लोकांना आवाहन केलेय. गुजरातमध्ये जसा पटेल समाज एकत्र आला तसे महाराष्ट्रात पाटलांनी एकत्र यावे, असे यावेळी राणे म्हणालेत. गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन सुरु आहे. एका अर्थाने राणे यांनी आंदोलनाचे समर्थन केल्याचे दिसत आहे.
अधिक वाचा - देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे रोमँटिक मुख्यमंत्री
दरम्यान, राणे यांनी भाजप-शिवसेना सरकारवर तोंडसुख घेतले. सरकारने कृत्रिम पावसावर पैसे खर्च करण्यापेक्षा जणावारांच्या चाऱ्यावर खर्च करायला हवे होते, असे नारायण राणे यांनी सरकारवर टीका करताना म्हटले. तर दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी, दुष्काळी भागाला मदत करण्याची मागणी करत सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शने केलीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.