मध्य रेल्वेवर तब्बल १८ तासांचा मेगाब्लॉग

मध्य रेल्वेचा हँकॉक ब्रिज पाडण्याचं काम दहा जानेवारीपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर तब्बल १८ तास परिणाम होणार आहे. 

Updated: Jan 8, 2016, 10:44 AM IST
मध्य रेल्वेवर तब्बल १८ तासांचा मेगाब्लॉग title=

मुंबई : मध्य रेल्वेचा हँकॉक ब्रिज पाडण्याचं काम दहा जानेवारीपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर तब्बल १८ तास परिणाम होणार आहे. 

या कामाच्या वेळी भायखळा स्थानकापर्यंतच मध्य रेल्वे सुरु राहणार आहे. भायखळा ते सीएसटी दरम्यान मध्य रेल्वेची सेवा पूर्णत: बंद असेल. 

मात्र, हार्बर मार्गावरुन सीएसटीपर्यंतच्या वाहतुकीवर याचा कोणताही परिणाम होणार नाहीय. शनिवारी रात्री १२.२० पासून रविवारी संध्याकाळी ६.२० पर्यंत हे काम सुरु राहणार असून या कामामुळे मध्य रेल्वेवर धावणाऱ्या १०० लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.