दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : गेल्या काही दिवसांपासून माझा माध्यमात उतरणाऱ्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे त्या नव्या माध्यमातूनच माझे व्यंगचित्र पाहायला मिळतील असे सुतोवाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत केले आहे.
रुईया कॉलेजच्या विद्यार्थ्यासमोर राज ठाकरे यांचे लेक्चर ठेवण्यात आले होते. त्यावेळी विविध विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला राज ठाकरे यांनी उत्तर दिलीत. त्यावेळी एका विद्यार्थाने राज ठाकरे यांना प्रश्न विचारला की तुमचे व्यंग्यचित्र कधी पाहायला मिळतील. त्यावर राज ठाकरे यांनी नवीन माध्यमासंदर्भात विचार सुरू आहे. त्यावर तुम्हांला भविष्यात व्यंग्यचित्र दिसतील असे सांगितले आहे.
यापूर्वी काही व्यंग्यचित्र काढली होती, ती सोशल मीडियावर डायरेक्ट टाकली. त्यामुळे ती तुमच्यापर्यंत पोहचली. आता एक नवीन माध्यमाचा विचार सुरू आहे. त्यातून व्यंग्यचित्र पाहायला मिळतील असे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे काढणार डिजीटल मॅगझीन
राज ठाकरे वृत्तपत्र क्षेत्रात येणार होते. पण या क्षेत्रातील आर्थिक गणित पाहता, त्यांनी यात अद्याप हात न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पण ते भारतातील पहिले डिजिटल मॅगझीन काढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यात बातम्या नसून मोठ्याप्रमाणात माहितीचा खजिना राज ठाकरे देणार आहेत.
अत्रेंचा 'मराठा'
यापूर्वी चर्चा सुरू होती की राज ठाकरे यांनी प्रल्हाद केशव अत्रे यांच्या 'मराठा' हे वृत्तपत्र विकत घेण्याचा विचार करत आहेत. या संदर्भात त्यांनी अत्रेंच्या कन्या शिरीष पै यांच्याशी चर्चा केली होती अशी बातमी समोर आली होती. तरीही राज ठाकरे यांच्याकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.