कांदिवलीत १२ वर्षांच्या मुलाचा गच्चीवरुन पडून मृत्यू

मुंबईच्या कांदिवली परिसरात एका 12 वर्षांच्या मुलाचा इमारतीच्या गच्चीवरून पडून मृत्यू झालाय. धर्मिक शाह असं या मुलाचं नाव आहे. धार्मिकचे वडील हिऱ्यांचे व्यापारी आहेत.

Updated: Jan 21, 2016, 09:24 AM IST
 कांदिवलीत १२ वर्षांच्या मुलाचा गच्चीवरुन पडून मृत्यू title=

मुंबई : मुंबईच्या कांदिवली परिसरात एका 12 वर्षांच्या मुलाचा इमारतीच्या गच्चीवरून पडून मृत्यू झालाय. धर्मिक शाह असं या मुलाचं नाव आहे. धार्मिकचे वडील हिऱ्यांचे व्यापारी आहेत.

काल दुपारी 3च्या सुमारास तो ट्युशनवरून परत आला. वॉचमनकडून गच्चीची चावी घेतली आणि थेट गच्चीवर गेला. तिथूनच पडून त्याचा अंत झाला. मात्र हा अपघात नसून आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. 

कारण या घटनेपूर्वी अवघ्या काही मिनिटांचं सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध झालंय. त्यात धार्मिक स्वतः चावीनं गच्चीचं दार उघडून गेल्याचं स्पष्ट झालंय. शेवटचा जिना चढण्यापूर्वी त्यानं कपाळाला हात लावून नमस्कार केल्याचंही स्पष्ट दिसतंय. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केलीये. अधिक तपास सुरू आहे.