मुंबईत डेंग्यूचे १२ बळी , केईएममध्ये बालिकेचा मृत्यू

 डेंग्यूने मुंबईत १२वा बळी घेतलाय. केईएम रुग्णालयात ४ महिन्यांच्या चिमुकलीचा डेंग्युमुळे मृत्यू झालेला आहे. कुर्ल्यातील सानिया शेख या चिमुरडीला डेंग्युमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत डेंग्यूचे एकूण १२ रुग्ण बळी पडले आहेत.

Updated: Nov 8, 2014, 10:09 AM IST
मुंबईत डेंग्यूचे १२ बळी , केईएममध्ये बालिकेचा मृत्यू title=

मुंबई  : डेंग्यूने मुंबईत १२वा बळी घेतलाय. केईएम रुग्णालयात ४ महिन्यांच्या चिमुकलीचा डेंग्युमुळे मृत्यू झालेला आहे. कुर्ल्यातील सानिया शेख या चिमुरडीला डेंग्युमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत डेंग्यूचे एकूण १२ रुग्ण बळी पडले आहेत.

याआधी केईएमच्या तीन निवासी डॉक्टरांना डेंग्यू असल्याचं समोर आलं आहे. ज्या डॉक्टरांना डेंग्यू झाला आहे, त्यातील दोन डॉक्टरांवर केईएममध्ये उपचार सुरू आहेत, तर एका डॉक्टरवर हिंदुजा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी केईएमच्या २३ वर्षीय निवासी महिला डॉक्टर, श्रुती खोब्रागडे यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. केईएम रूग्णालयात अनेक ठिकाणी साफसफाई नसल्याचं सांगण्यात येत आहे. एका निवासी महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतरही केईएम प्रशासन सुधारलं नसल्याचं दिसून येत आहे. रूग्णालयाचं प्रशासनच असं वागत असेल, तर सर्वसामान्य जनतेचं काय असा सवाल उपस्थित होतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.