मुंबई: टिव्हीवरील रिअॅलिटी शो मधील स्टंट मुंबईतल्या कांजुरमार्गमधील एका चिमुकल्याच्या जीवावर बेतलाय. सोहम मोरे असं या ११ वर्षांच्या दुर्दैवी बालकाचं नाव आहे.
आई-वडील घरी नसताना धाकट्या भावासोबत ओढणीनं रिअॅलिटी शोमधील खेळ खेळताना अचानक छताच्या पाईपला गळफास लागला. यात सोहन मोरेचा जागीच मृत्यू झाला. वडील बाहेरगावी गेले होते. तर आई कामानिमित्तानं बाहेर गेली असता दोघा भावांना घरात ठेवून बाहेरून लॉक लावून गेली.
नेहमीप्रमाणे दोघं भाऊ घरात आईच्या ओढणीनं खेळत होते. सोहमनं ओढणी गळ्याला बांधली आणि दुसरा भाग छताच्या पाईपला बांधून झोका घेतला यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. रिअॅलिटी शो बघतांना पालकांनी आपल्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचं या घटनेमुळं पुढं आलंय.
आणखी वाचा - ३ डॉक्टरांना दारू पिऊन गाडी चालविण्याप्रकरणी अटक
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.