मुंबई : चित्तोडगडची राणी पद्मावतीच्या भूमिकेसाठी दीपिकाने ११ कोटी रूपये घेतले आहेत. मस्तानीच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोणने वाहवा मिळवली होती, आता दीपिका पद्मावती राणीची भूमिका करण्यास सज्ज झाली आहे.
जागतिक स्तरावर मानधनाच्या बाबतीत दहाव्या क्रमांकावर असलेल्या दीपिकाने पद्मावतीसाठी रणवीर सिंहपेक्षा जास्त अकरा म्हणजे कोटी रुपयांचे मानधन घेतले असल्याचे वृत्त आहे. रणवीर सिंहने सात ते आठ कोटी रुपयांचे मानधन घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.
संजय लीला भन्साळीच्या या चित्रपटात रणवीर सिंह अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका करणार आहे, तर पद्मिनीचा पती राजा रतन रावळ सिंहाच्या भूमिकेत शाहीद कपूर झळकणार आहे.
मोहेनजो दारोसारखा सिनेमा फ्लॉप झाल्यामुळे इरॉस इंटरनॅशनलने पद्मावती बनवताना बजेटकडे लक्ष द्यावे, अशी सूचना केल्याचे सांगण्यात येत आहे.
पद्मावती हा बाराव्या शतकातल्या अल्लाउद्दिन खिलजीने राणी पद्मिनीच्या मोहापायी चित्तोडवर केलेल्या आक्रमणावर आणि त्यानंतर पद्मिनीसह शेकडो महिलांनी केलेल्या जोहारवर बेतलेला चित्रपट आहे.