www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिहारींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी देखील बिहारींच्या घुसखोरीबाबत वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरेंनी यांनी परप्रांतियांच्या घुसखोरीबाबत एक वेगळाच उपाय समोर ठेवला आहे. ज्या बिहारींना मुंबईत राहायचं आहे, किंवा काम करायचं आहे. त्याच्यांसाठी एक परमिट व्यवस्था लागू केली पाहिजे.
ज्याप्रमाणे बिहार पोलिसांच्या डिजीने मुंबई पोलिसांना बिहारमध्ये येण्याविषयी धमकावलं, किंवा त्यांना येण्यास मनाई केली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने बिहारी नागरिकांवर मुंबईत येण्यावर बंधने घातली गेली पाहिजेत. त्याच्यांसाठी परमिट व्यवस्था तयार केली पाहिजे.
बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. बिहारींनी मुंबईत जे काम केलं आहे, ते पाहता नीतिशकुमार यांना लाज वाटायला हवी, मात्र ते तर बिहारींचे कौतुक करतायेत.. शिवसेनेने नीतिशकुमारांना देखील तंबी दिली आहे. जर त्यांनी गुंडाना साथ नाही दिली तरच २०१४ मध्ये त्यांना समर्थन देऊ.