२५ वाघांची घेतली शिकाऱ्यांनी सुपारी!

राज्यातील वाघांना शिकारी टोळ्यांपासून धोका निर्माण झालाय. शिकारी टोळ्यांनी २५ वाघांच्या शिकारीची सुपारी घेतल्याची खळबळजनक माहिती गुप्तचरांकडून मिळालीये.

Updated: May 16, 2012, 05:31 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

राज्यातील वाघांना शिकारी टोळ्यांपासून धोका निर्माण झालाय. शिकारी टोळ्यांनी २५ वाघांच्या शिकारीची सुपारी घेतल्याची खळबळजनक माहिती गुप्तचरांकडून मिळालीये.

 

मध्यप्रदेशातल्या या टोळीनं 40 लाखांच्या सुपारीची रक्कम स्वीकारल्याची माहिती आहे. राज्यात सध्या 106 वाघ असल्याची माहिती आहे. त्यामुळं वाघांचा वावर असलेल्या राज्यातील सर्व व्याघ्रप्रकल्प आणि अभयअरण्यात हायअलर्ट जारी करण्यात आलाय.

 

राज्यातल्या सर्व वनकर्मचा-यांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्यात. त्यांना १५ जूनपर्यंत सुट्टीवर जाऊ नये असे आदेश देण्यात आलेत. वाघांचा वावर असलेल्या पाणवठ्यांवर आणि नदी नाल्यांवर वनसंरक्षकांची गस्त वाढवण्यात येणार आहे.

 

 

शिवाय सापळ्यांची माहिती देणा-यांना पाच हजारांचे बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रपुरात दोन वाघ शिका-यांच्या सापळ्यात अडकले होते. यातल्या एका वाघाचा मृत्यू झालाय. तर एक वाघ मृत्यूशी झुंज देतोय. या घटनेमुळं शिका-यांच्या टोळ्या सक्रिय झाल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळालीये.

 

[jwplayer mediaid="102083"]