शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचं प्रकाशन

१६४६ ते १६७९ या कालावधीत शिवाजी महाराजांनी मोडी लिपीत लिहिलेल्या २८ मूळ पत्रांचं देवनागरी लिपीत भाषांतर करण्यात आलंय. या पत्रांच्या भाषांतरामुळं ती इतिहास संशोधकांना आणि सर्वसामान्य नागरिकांनीही समजू शकणार आहेत.

Updated: Apr 6, 2012, 11:13 AM IST

www.24taas.com, मुंबई

राज्याच्या पुनराभिलेख संचालनालयानं संपादित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रे या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं.

१६४६ ते १६७९ या कालावधीत शिवाजी महाराजांनी मोडी लिपीत लिहिलेल्या २८ मूळ पत्रांचं देवनागरी लिपीत भाषांतर करण्यात आलंय. या पत्रांच्या भाषांतरामुळं ती इतिहास संशोधकांना आणि सर्वसामान्य नागरिकांनीही समजू शकणार आहेत.

महाराजांची पत्रे प्रेरणा देणारी असल्याचं सांगत त्यांच्या राज्यकारभाराची पद्धत तसंच वेळोवेळी दिलेली आज्ञापत्रे यावरुन त्यांच्या कल्याणकारी राज्यकारभाराची प्रचिती येते असंही मुख्यमंत्री म्हणाले. या शिवाय शिवाजी महाराजांचा इतिहास इ-बुक स्वरुपात उपलब्ध व्हावा, आणि त्यावर संशोधन करणारे अनेक इतिहास संशोधक निर्माण व्हावेत, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

पुराभिलेख संचालनालयाकडे सुमारे १५ कोटी अभिलेख असून त्यातले पाच कोटी अभिलेख हे मोडी लिपीतील आहे, आशिया खंडातील ही सर्वात मोठी पुराभिलेख संस्था आहे.