पहिल्या तीन सामन्यात अपयशी ठरलेल्या वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी इंदूर येथील चौथ्या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेल अशी कामगिरी करत अवघ्या १४ षटकांत भारताचा स्कोर १००च्या वर नेला.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आज दुपारी २.३० वाजता या सामन्याला सुरुवात झाली. भारतीय संघात एक बदल करण्यात आला असून गोलंदाज उमेश यादवऐवजी राहुल शर्मा याचा समावेश करण्यात आला आहे. तर इरफान पठाणला मात्र संघात स्थान मिळालेलं नाही. तर दुसरीकडे विंडीजचा डॅरेन ब्राव्हो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाही. त्याच्याऐवजी किरॉन पोलार्डला संधी मिळाली आहे.
इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जात आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१च्या फरकाने आघाडीवर आहे. पण हा सामना जिंकून ही मालिकाही जिंकण्याचं आव्हान भारतासमोर आहे.