राणेंनी काय केलं, झाला हक्कभंग...

उद्योगमंत्री नारायण राणें यांच्या विरोधात विधिमंडळात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी हा हक्कभंग दाखल केला आहे. नारायण राणे यांनी विधिमंडळात भाजप नेत्यांनी भूखंड लाटल्याचा आरोप केला होता.

Updated: Apr 20, 2012, 03:54 PM IST

www.24taas.com, मुंबई

उद्योगमंत्री नारायण राणें यांच्या विरोधात विधिमंडळात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी हा हक्कभंग दाखल केला आहे. नारायण राणे यांनी विधिमंडळात भाजप नेत्यांनी भूखंड लाटल्याचा आरोप केला होता.

या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोपही राणेंनी केला होता. यावर फडणवीसांनी आपण कोणत्याही भूखंडाचे लाभार्थी नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. आज हक्कभंग दाखल करताना त्यांनी याबाबत पुन्हा पुनरुच्चार केला आहे.

काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडवणीस यांनी सरकारमधील काही मंत्र्यांवर आरोप केले होते, तसेच यापूढेही आपण अनेक घोटाळे बाहेर काढणार असल्याचे वक्तव्य फडवणीस यांनी केले होते. त्यानंतर देखीला फडवणीस यांनी काही बाबी सभागृहात मांडल्या होत्या.