मुंबई विमानातळ बंद

मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आज पाच तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विमानांची सर्व उड्डाणे सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेचारपर्यंत बंद राहणार आहेत. मुंबई विमानतळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम विमानतळ आहे.

Updated: Feb 25, 2012, 02:14 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आज पाच तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विमानांची सर्व उड्डाणे सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेचारपर्यंत बंद राहणार आहेत. मुंबई विमानतळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम विमानतळ आहे.

मुंबईतील विमानतळाच्या धावपट्टीच्या डागडुजी करण्यात येणार आहे. त्यासाठी  विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विमानतळ बंद ठेवण्यात येणार असल्याची सूचना तीन महिन्यांपूर्वीच देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आल्याने याचा परिणाम प्रवाशांवर किंवा विमान कंपन्यांवर होणार नाही.  मुंबईत येणाऱ्या प्रवाशांनी पुणे विमानतळाचा वापर करण्याचे आवाहन, प्रशासनाने केले आहे.

मार्च महिन्यातही दोन शनिवारी विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळीही  विमानतळाच्या धावपट्टीच्या डागडुजी करण्यात येणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

व्हिडोओ पाहा..

[jwplayer mediaid="55138"]