मुंबई आजारांच्या गराड्यात!

मुंबई डेंग्यू आणि मलेरियाच्या विळख्यात सापडलीय. याशिवाय कॉलरा आणि डायरियानंही आजारी असलेल्या मुंबईतील रुग्णांच्या संख्येत वाढ झालीय. मुंबई महापालिकेनं जारी केलेल्या गेल्या तीन वर्षातील आकडेवारीतून हे समोर आलंय.

Updated: Jul 25, 2012, 09:56 AM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबई डेंग्यू आणि मलेरियाच्या विळख्यात सापडलीय. याशिवाय कॉलरा आणि डायरियानंही आजारी असलेल्या मुंबईतील रुग्णांच्या संख्येत वाढ झालीय. मुंबई  महापालिकेनं जारी केलेल्या गेल्या तीन वर्षातील आकडेवारीतून हे समोर आलंय.

२०११-१२ मध्ये डेंग्यूने आजारी असलेल्या रुग्णांच्या संख्येत १७६ टक्के वाढ झालीय. ही संख्या १,८७९ इतकी आहे. कॉलरानं त्रस्त रुग्णांच्या संख्येत ८५ टक्के वाढ झाली असून ती संख्या १७८ इतकी आहे. मलेरियाच्या रुग्णांची संख्या ७१ टक्के वाढली असून या रुग्णांची संख्या ३९,८२८ इतकी झालीय. तर डायरियानं त्रस्त रुग्णांच्या संख्येत २३ टक्के वाढ झाली असून ही संख्या ९९,८३९ इतकी आहे. पालिकेनं ही आकडेवारी जारी केलेली असली तरी ७५ टक्के मुंबईकर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात, त्यामुळं पालिकेची ही आकडेवारी आणखी जास्त असण्याची शक्यता आहे.

.