www.24taas.com, मुंबई
मुंबईच्या महापौरपदाची निवड येत्या ९मार्चला होणार आहे. या निवडमुकीसाठी शिवसेना-भाजपकडून नगरसेवकांना व्हिप जारी करण्यात आला आहे. २६ मार्चपर्यंत मुंबई सोडू नका, असे आदेश नगरसेवकांना देण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबईत दगाफटक्याची भिती असल्याने हा व्हिप असल्याचे सांगण्यात येत आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत महापौर पदासाठी शिवसेनेला मोठी कसरत करावी लागली होती. त्यातच युतीच्या मित्र पक्षाची एक नगरसेविका गायब झाली. त्यामुळे महापौरपदाची निवडसाठी मॅजिक फिगर गाठण्याचे स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता निर्माण झाले. या संधीचा फायदा उठविण्यासाठी दोन्ही काँग्रेसनेही कंबर कसली. त्यांनीही फिल्डींग लावली. त्यामुळे सत्तेसाठी राजकीय नाट्य रंगू लागले. युतीकडे जास्त जागा असूनही सत्ता स्थापन करणे अवघड होते. मात्र, जनभावनेचा विचार करून राज ठाकरेंनी हा फक्त ठाण्यापुरताच पाठिंबा आहे असं सांगितले. त्यामुळे सेनेचा वारू ठाण्यात वाचला.
ठाण्यातील ही भिती मुंबईत आहे. त्यामुळे कोणतीही रिक्स न घेता शिवसेना-भाजप युतीने आपल्या नगरसेवकांसाठी व्हिप जारी केला आहे. महापौरपदाची निवडसाठी राजकीय घोडेबाजार होऊन दगाफटका बसू शकतो. त्यामुळे राजकीय घोडेबाजार रोखण्यासाठी हा व्हिप असल्याचे गणित आहे. मात्र, मुंबई पालिकेत शिवसेनेकडे जास्त जागा असल्यातरी बहुमत नाही. तसेच पालिकेतील विषय समित्या निवडणुकीत युतीचे प्रावल्य राखण्यासाठी हा व्हिप २४ मार्चपर्यंत लागू राहणार आहे. या व्हिपमुळे नगरसेवकांची गोची झाली आहे. दरम्यान, मुंबईत दगाफटक्याच्या भितीने युतीतील काही पदाधिकारी धास्तावलेले दिसून येत आहे. त्यामुळे ९ मार्चला काय होते, याकडे लक्ष लागले आहे.