मुंबईतून सहा अल्पवयीन मुली गायब

मुंबईतील कालिना परिसरातून क्लास आणि परीक्षेला गेलेल्या सहा अल्पवयीन मुली गायब झाल्या आहेत. या मुली तीन दिवस झाले तरी घरी परतल्या नसल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. या मुलींच्या घरात सन्नाटा पसरला आहे. काही पालकांनी हंबरठा फोडला आहे.

Updated: Mar 24, 2012, 12:58 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईतील कालिना परिसरातून क्लास आणि परीक्षेला गेलेल्या सहा अल्पवयीन मुली गायब झाल्या आहेत. या मुली तीन दिवस झाले तरी घरी परतल्या नसल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. या मुलींच्या घरात सन्नाटा पसरला आहे. काही पालकांनी हंबरठा फोडला आहे.

२२ मार्चपासू बेपत्ता झालेल्या मुली या शालेय आणि महाविद्यालयीय विद्यार्थींनी आहेत. यातील काही विद्यार्थींनी क्लासला जात असल्याचे सांगितले. तर चार जणींनी परीक्षा असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या.  बेपत्ता मुलींमध्ये सातवी आणि आठवीतील प्रत्येकी एक तर नववीत शिकणाऱ्या तीन आणि १२ वीतील एकीचा समावेश आहे. मुली हरविल्याची तक्रार या मुलींच्या पालकांनी वाकोला पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

मुलींच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर सहा मुली गायब झाल्याची बाब उघड झाली. मुलींचे अपहण करण्यात आले आहे का? की त्या परीक्षेच्या भितीने घराबाहेर गेल्या आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत.  सातवीत शिकणाऱ्या मुलीचे वय १२ आणि नववीतील १४ -१५ दरम्यान  तर बारावील  विद्यार्थींनीचे वय १७ वर्षे आहे. त्यामुळे त्यांचे अपहरण झाल्याचा पालकांचा संशय आहे. मुली गायब झाल्याने पालकांनी धास्ती घेतली असून काही पालकांनी हंबरठा फोडला आहे. त्यामुळे परीसरात सन्नाटा पसरला आहे.