मुंबईच्या महापौरांवर कारवाई होईल - बाळासाहेब

मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं स्पष्टीकरण बाळासाहेब ठाकरेंनी दिली आहे. प्रभू यांनी निवडणूक लढवताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी शैक्षणिक माहिती दिली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Updated: Apr 15, 2012, 04:30 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं स्पष्टीकरण बाळासाहेब ठाकरेंनी दिली आहे. प्रभू यांनी निवडणूक लढवताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात  खोटी शैक्षणिक माहिती दिली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात प्रभूंनी दहावीपर्यंत शिक्षण घेतल्याच नंमूद केल होत.

 

यानंतर नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत सुनिल प्रभूनी बारावीपर्यंत शिक्षण घेतल्याचं शपथपत्रात नमूद केलं आहे. या तफावतीचा मुद्दा हाती घेत विरोधकांनी सुनील प्रभूंना पदावरुन हटवावं अशी मागणी केली होती. या पाश्वभूमीवर बाळासाहेबांनी सुनील प्रभूंना क्लीन चिट दिली जाणार नाही असं म्हटलं आहे. ते दोषी असल्यास त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल असं बाळासाहेबांनी सांगितलं आहे.

 

मुंबईचे महापौर सुनील प्रभू त्यांच्यावर झालेल्या एका आरोपानं वादात सापडले आहेत. पालिका निवडणूकीत प्रभंनी शिक्षणाची खोटी माहीती दिल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार राजहंस सिंह यांनी विधानसभेत केला आहे. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात प्रभूनी दहावीपर्यंत शिक्षण घेतल्याच नमूद केल होतं. या निवडणुकीत सुनील प्रभूचा पराभव झाला. यानंतर नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत सुनिल प्रभूनी बारावीपर्यंत शिक्षण घेतल्याचं शपथपत्रात नंमूद केल्याचं राजहंस सिंह यांचं म्हणणं आहे.

 

महापौरानी निवडणूक आयोगाला खोटी माहीती दिल्यामुळं त्यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. महापौरानी मात्र राजहंस सिंहांच्या या आरोपाच खंडन करत शपथपत्रात सत्य माहीतीच दिल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. महापौंरांवर केलेल्या या आरोपात तथ्य आहे की नाही हे चौकशीत उघड होईलच, मात्र यानिमित्तानं काँग्रेसनं महापौरांना पुन्हा टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. हे दिसून आलं आहे. तसचं गोरेगांव दिंडोशी विधानसभा मतदारसंघातल्या दोन दिग्गजांची लढाई असंही या वादाकडं पाहण्यात येतं आहे.