मनसे आमदारांच्या कार्यालयावर हल्ला

मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या कार्यालयावर दगडफेक तीन बाईकवर आलेल्या सहा जणांकडून दगडफेक करण्यात आली. मात्र, ही का दगडफेक केली याचे कारण समजू शकलेले नाही. आमदार दरेकरांचे दहिसर येथे ऑफिसवर आहे. दरेकरांच्या ऑफिसबाहेरील सीसीटीव्ही फोडले.

Updated: Jun 10, 2012, 11:13 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या कार्यालयावर दगडफेक तीन बाईकवर आलेल्या सहा जणांकडून दगडफेक करण्यात आली. मात्र, ही का दगडफेक केली याचे कारण समजू शकलेले नाही. आमदार दरेकरांचे दहिसर येथे ऑफिसवर आहे. दरेकरांच्या ऑफिसबाहेरील सीसीटीव्ही फोडले.

 

मनसे आमदार प्रवीण दरेकर यांच्या दहीसरमधील कार्यालयावर काही अज्ञात लोकांनी हल्ला केला. मिळालेल्या माहिती नुसार तीन बाइक वरुन सहा व्यक्ती कार्यालयाच्या दिशेने आले. त्यांनी स्टील रॉडने कार्यालया बाहेरील सीसीटाव्ही फोडले आणि दगडफेक केली. घटनेची माहिती कळताच मनसेचे सुमारे 200 ते तीनशे कार्यकर्ते घटनेस्थळी पोहचले. झालेल्या प्रकाराची पोलीसात तक्रार करण्यात आली आहे.

 

आमदार दरेकर याच्या दहीसर इथल्या कार्यालयावर हल्ला झाल्ल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्याची ही exclusive दृश्य फक्त झी 24 तासकडे उपलब्ध झाली आहेत. या फूटेजमध्ये हल्लेखोर आणि त्याच्या बाइकस या स्पष्टपणे ओळखू येत आहेत. त्यामुळे हल्लेखोर कोण आहेत, याची माहीती मिळण्यास मदत होणार आहे.