मंगेशकर कुटुंबियांवर चिखलफेक का? - उद्धव

सरकारी नियमात बसत नसतानाही सचिन तेंडुलकरच्या बंगल्यासाठी वाढीव एफएसआय देण्याची मागणी ज्यांनी केली ते आता पेडर रोडच्या फ्लाय ओव्हरवरून मंगेशकर कुटुंबियांना लक्ष्य करीत आहेत, उड्डाणपुलाचे निमित्त करून महाराष्ट्राच्या मानचिन्हावर चिखलफेक करू नये, असा सल्ला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.

Updated: Dec 7, 2011, 01:13 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई
सरकारी नियमात बसत नसतानाही सचिन तेंडुलकरच्या बंगल्यासाठी वाढीव एफएसआय देण्याची मागणी ज्यांनी केली ते आता पेडर रोडच्या फ्लाय ओव्हरवरून मंगेशकर कुटुंबियांना लक्ष्य करीत आहेत, उड्डाणपुलाचे निमित्त करून महाराष्ट्राच्या मानचिन्हावर चिखलफेक करू नये, असा सल्ला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दिला आहे. त्यामुळे आता पेडर रोड फ्लाय़ओव्हरवरून राजकारण चांगलेच तापलंय.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगेशकर कुटुंबीयांविरोधात दंड थोपटल्यानं मंगेशकरांच्या समर्थनासाठी उद्धव ठाकरे यांनीही आता या वादात उडी घेतलीय. फ्लायओव्हरचं निमीत्त करून मंगेशकर कुटुंबीयांना या वादात कशासाठी ओढतात असा सवाल उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना केलाय.

 

पेडररोडचा उड्डाण पूल करायचा किंवा नाही हे सरकार ठरवेल मात्र या उड्डाणपुलाचे निमित्त करून महाराष्ट्राच्या मानचिन्हावर चिखलफेक करू नये असा सल्ला उद्धव यांनी राज यांना दिला आहे. उद्धव ठाकरेंनीही या वादात उडी घेतल्यानं राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात या निमित्तानं नवा संघर्ष सुरु झाला.

 

लता मंगेशकर, आशा भोसले आणि सचिन तेंडुलकर ही महाराष्ट्राची मानचिन्ह आहेत. त्यांचा सन्मान व्हायलाच हवा. या मानचिन्हांमुळंच आज महाराष्ट्राची ओळख देशात आणि जगभरात आहे. त्यांच्या प्रतिमेला तडे जातील असं वागू नये असा टोमणाही त्यांनी राज ठाकरेंना मारलाय.

 

मुळात पेडररोडच्या उड्डाणपुलाचा निर्णय रद्द झाला नसल्याची भूमिका खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलीय. त्यामुळं मंगेशकर कुटुंबियांना या वादात ओढण्याची गरज नसल्याचं उद्धव यांनी स्पष्ट केलंय.

 

[jwplayer mediaid="11949"]