www.24taas.com, मुंबई
मुंबईत बिहार दिन साजरा केला जाईल. आम्हाला कोणीही अडवून शकत नाही, असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी केले होते. त्यानंतर मालेगावात तुम्ही मुंबईत बिहार दिन साजरा करून दाखवाच, असा इशारा ठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. आज मुंबईत १५ एप्रिल रोजी मुंबईत साजरा करण्यात येणाऱ्या बिहारदिनाबाबत भूमिका ठरविण्यासाठी कृष्णकुंजवर मनसे आमदारांची तातडीची बैठक बोलाविली.
या बैठकीत बिहारदिनाविषयी भूमिका ठरविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या १५ एप्रिलला मुंबईत बिहारदिन साजरा केला जाईल, असे आवाहन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले होते. त्यांच्या या आव्हानाला राज यांनी मालेगाव महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत काल आव्हान दिले. महाराष्ट्र धर्मशाळा आहे का, महाराष्ट्र तुम्हाला बापाचा माल वाटला काय, अशा कडक शब्दात राज ठाकरे यांनी मालेगाव सभेत फटकारले होते.
नीतिशकुमार यांनी बिहारचा विकास करावा. मुंबईत बिहारदिन साजरा करायचे कारणच काय? महाराष्ट्र म्हणजे धर्मशाळा आहे का? बिहार दिन २२ मार्चलाच साजरा झाला असताना राजकारण करण्यासाठी १५ एप्रिलला बिहारदिन मुंबईत येऊन साजरा करण्याचे कारण काय, आदी प्रश्न उपस्थित केले होते. त्या पार्श्वभूमीवर मनसेच्या आजच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत मनसे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
संबंधित बातमी