पालिका ५ कोटीचा रोबो उतरवणार गटारात

मुंबई महापालिकेन नालेसफाईसाठी मल्टीपर्पज एक्सेवेटर रोबोचा वापर करण्यास सुरवात केलीयं. मल्टीपर्पज रोबो पाच कोटी पंचवीस लाखात पालिकेन विकत घेतला आहे.

Updated: Apr 13, 2012, 12:09 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई महापालिकेन नालेसफाईसाठी मल्टीपर्पज एक्सेवेटर रोबोचा वापर करण्यास सुरवात केलीयं. मल्टीपर्पज रोबो पाच कोटी पंचवीस लाखात पालिकेन विकत घेतला आहे. या मल्टीपर्पज रोबोन नालेसफाईत चांगला रिझल्ट दिला तर पालिका अधिक सात मल्टीपर्पज रोबो विकत घेणार. मुंबई महापालिकेनं रोबोटिक नालेसफाई सुरू केलीयं. मिठी नदी ते महापालिकेच्या नालेसफाईसाठी हा रोबो पालिकेन घेतला

 

रोबोटिक मल्टीपर्पज एक्सेवेटर जेसीबी, पोक्लेन, ड्रेजर या तिन्ही संयंत्रानं काम करू शकतो. हा रोबो २ मीटर खोल आणि अडीच मीटर रुंद नाल्यात काम करू शकत असल्याचा महापालिका अधिका-यांचा दावा आहे. टेलीस्कोपिक बूमच्या सहाय्यानं रोबो नालेसफाई करून ओला आणि सुका गाळ व्यवस्थित बाहेर काढू शकतो. गेल्यावर्षी पालिकेनं ३ लाख ९८ हजार मेट्रिक टन गाळ मनुष्य आणि जेसीबीच्या सहाय्यानं काढला होता.

 

यंदा  मात्र मल्टीपर्पज रोबोमुळे अधिक गाळ काढला जाईल असा दावा पालिकेतील अधिकाऱ्यांसह शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेनी केला. रोबोमुळे नालेसफाईचं काम अधिक सुलभ झालं तर पालिका आणखी सात मल्टिपर्पज रोबो विकत घेणारेए. आत्तापर्यंत ७० कोटी नालेसफाईवर खर्च केलेल्या महापालिकेनं रोबोची खरेदी करून नुसताच खर्च केलाय? की खरंच त्याद्वारे मुंबईकरांची खरंच वॉटर लॉगिंगची समस्या सुटणार?  हे लवकरच कळेल.