दूध महागलं, बजेट कोलमडलं

वाढत्या महागाईमुळे मुंबईकरांचं महिन्याचं बजेट पुर्णपणे कोलमडलंय. आता १ एप्रीलपासुन सुट्या ताज्या १ लिटर दुधासाठी ४८ रुपये मोजावे लागणार आहेत. सुटे ताजे दुध आता ३ रूपयांनी महाग झालंय. त्यामुळे आगीतून फुफाट्यात अशी सर्वसामान्यांची अवस्था झालीय.

Updated: Mar 31, 2012, 05:29 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

वाढत्या महागाईमुळे मुंबईकरांचं  महिन्याचं बजेट पूर्णपणे कोलमडलंय. आता १ एप्रीलपासुन सुट्या ताज्या १ लिटर दुधासाठी ४८ रुपये मोजावे लागणार आहेत. सुटे ताजे दुध आता ३ रूपयांनी महाग झालंय. त्यामुळे आगीतून फुफाट्यात अशी सर्वसामान्यांची अवस्था झालीय.

 

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाच्या महिन्याचं बजेट पुर्णपणे कोलमडलंय. त्यातच आता सुट्या दुधाचे भाव तीन रूपयांनी वाढमार आहेत. त्यामुळे आगीतून फुफाट्यात अशी त्यांची अवस्था झाली आहे.

 

सुटं ताजं दुध यापुर्वी साधारणपणे ४५ रूपये लिटर या भावानं मिळत होतं. मात्र आता १ एप्रिलपासुन सुट्या ताज्या १ लिटर दुधासाठी ४८ रुपये मोजावे लागणार आहेत. पेट्रोल-डिजेलचे सतत वाढते बाव आणि पशू खाद्याच्या वाढत्या किमतींमुळे भाववाढ अटळ असल्याचं बॉम्बे मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनचं म्हणणं आहे. सगळ्याच जीवनावश्यक गोष्टींचे भाव सातत्यानं वाढत आहेत त्यामुळे सर्व सामान्यांची अवस्था सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशीच झालीय.