www.24taas.com, मुंबई
पत्रकार जे.डे. हत्याप्रकरणातील आरोपी जिग्ना व्होरा हिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सेशन्स कोर्टाने 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जिग्नाचा जामीन मंजूर केला आहे मात्र आठवड्यातून दोनदा तिला गुन्हे शाखेत हजेरी द्यावी लागणार आहेत तसंच या प्रकरणातील कुठल्याही पुराव्यांशी छेडछाड न करण्याबाबतचा आदेशही तिला न्यायालयाने दिला आहे.
छोटा राजनला ‘जेडे’ यांच्याबद्दलची माहिती, जेडेंच्या घराचा पत्ता आणि बाईकचा नंबर दिल्याचा आरोप जिग्ना व्होरावर आहे.छोटा राजन विरोधात लिहलेले लेख राजनला पुरवणे, छोटा राजनच्या मनात जेडे यांच्याविषयी द्वेष निर्माण करणे, असे आरोप जिग्ना व्होरावर आहेत. पत्रकार जे.डे. हत्याप्रकणात जिग्ना जामीन मिळवू शकणारी पहिलीच आरोपी आहे.तिच्या शिवाय अन्य सर्व आरोपी आद्याप कारागृहात आहेत.
क्राईम रिपोर्टर जे.डे. यांची 11 जून 2011ला पवई मध्ये जे डे यांची हत्या कऱण्यात आली होती. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या सांगण्यावरून जे डे यांची हत्या करण्यात आली होती. जे डे यांच्या हत्येमागचं कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मुंबई क्राइम ब्रांचने पत्रकार जे डे यांच्या हत्येप्रकरणी मोक्का कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आली होती. 3055 पानांचे हे दाखल केलेले चार्जशीट होती.या प्रकणात आता पर्यंत पोलीसांनी 11 जणांना अटक केली आहे.