अबू जिंदालचे धक्कादायक दावे

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू हमजाचा 2010 पूर्वीच मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा अबू जिंदाल यानं केलाय. अबू हमजा देशातल्या अनेक अतिरेकी हल्ल्यांचा सूत्रधार होता. बंगळूरुच्या इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ सायन्सवर हल्ला अबू जिंदालवनं घ़डवून आणला होता.

Updated: Jul 9, 2012, 11:43 AM IST

www.24taas.com मुंबई

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू हमजाचा 2010 पूर्वीच मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा अबू जिंदाल यानं केलाय. अबू हमजा देशातल्या अनेक अतिरेकी हल्ल्यांचा सूत्रधार होता. बंगळूरुच्या इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ सायन्सवर हल्ला अबू जिंदालवनं घ़डवून आणला होता.

एका आजारात अबू हमजाचा मृत्यू झाला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी 2010 मध्ये त्यांच्यावर रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती.

जम्मू काश्मीरच्या छत्तीसिंहपुरा गावातील शिख हत्याकांड लष्कर ए तोयबानं घडवल्य़ाचा गौप्यस्फोट अतिरेकी अबू जिंदाल यानं केलाय. मार्च 2000 मध्ये हे हत्याकांड घडवण्यात आलं होतं. या हत्याकांडात 35 शिख बांधवांचा मृत्यू झाला होता. हे हत्याकांड भारतीय लष्करानं घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला होता. अबू जिंदालच्य़ा गौप्य़स्फोटामुळं भारतीय लष्कर निष्कलंक असल्याचं स्पष्ट झालंय.