मुंबई : काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांना त्यांच्या पायाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. आजच त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तीन डिसेंबर रोजी पवार नवी दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानी चालण्याचा व्यायाम करत असताना भोवळ आल्याने पाय घसरुन पडले. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने शस्त्रक्रियेसाठी त्यांना हवाई रुग्णवाहिकेद्वारे मुंबईत आणण्यात आले होते.
ब्रीच कँडी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.