नागपूर : नागपुरातील युग चांडक हत्याकांडातील आरोपींचा फैसला आज होणार आहे. युगचं अपहरण करुन त्याची हत्या करणा-या दोघांना कोर्टानं दोषी ठरवलंय. त्यामुळं या दोन्ही आरोपींना फाशी होणार की जन्मठेप याकडं नजरा लागल्या आहेत.
नागपुरमधील छापरु नगर परिसरात 8 वर्षांच्या युग चांडक या मुलाचं घरासमोरुन अपहरण झालं होतं. युगच्या वडिलांच्या रुग्णालयातील कर्मचारी असलेल्या राजेश दावरेनं आपला मित्र अरविंद सिंहच्या मदतीनं युगचं अपहरण केलं होतं. डॉ मुकेश चांडक यांच्याशी झालेल्या वादानंतर राजेशने बदला घेण्याच ठरवलं आणि त्यांच्या मुलाचं अपहरण केलं. युगला दुचाकीवरुन नागपूरबाहेर नेलं आणि त्याचा निर्दयपणे खून केला. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी चांडक परिवारानं केलीय.
या संपूर्ण प्रकरणात एकूण ५० साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. या प्रकरणातील प्रमुख आरोपी राजेश दावरे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून कमी वेळात आणि झटपट श्रीमंत होण्याचं तो स्वप्न बघत होता. संपूर्ण नागपुरात खळबळ माजवणारी ही घटनेतील गुन्हेगारांना आता न्यायालय काय शिक्षा सुनावते याकडे नागपुरांकडे लक्ष लागून राहिलय.