शनीशिंगणापूर: शनिशिंगणापूरमध्ये शनिचौथ-यावर सर्वांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच भूमाता महिला ब्रिगेडच्या आंदोलकांनी चौथ-यावर जाऊन दर्शन घेतलं.
भूमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा पुष्पक केवडकर आणि प्रियांका जगताप यांनी शनिच्या चौथ-यावर जाऊन दर्शन घेण्याचा ऐतिहासिक मान पटकावला. त्यांनी चौथ-यावर जाऊन शनिचा तेलानं अभिषेक केला.
गेल्या काही दिवासांपासून चौथ-यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी माध्यमांमध्ये चर्चेत असलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यावर सरशी करत केवडकर आणि जगताप यांनी दर्शन घेतलं.