अकोला : अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत झालेल्या हलगर्जीपणात एका महिलेचा मृत्यू झालाय. शीतल शंकर देशमुख असं या महिलेचं नाव आहे. ती अकोला जिल्ह्यातील निंबा गावाची रहिवासी आहे.
जिल्हा रूग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या पाच महिलांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर अकोल्याच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यातील एकीची प्रकृती अद्यापही गंभीर आहेय.
शस्त्रक्रिया करतांना हलगर्जीपणा झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलाय. याप्रकरणी पोलीस तक्रार करणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिलीय. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिका-यांच्या नेतृत्वात सात सदस्यीय समिती गठित करण्यात आलीय. या प्रकाराने आरोग्य विभाग चांगलाच हादरून गेलाय.