महिलांचा दारूच्या दुकानावर हल्लाबोल केली सामानाची नासधूस

वैजापूर तालुक्यातील शिऊर गावात महिलांनी देशी दारूच्या दुकानावर हल्लाबोल केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 3, 2017, 04:34 PM IST

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील शिऊर गावात महिलांनी देशी दारूच्या दुकानावर हल्लाबोल केलाय.

यावेळी महिलांनी दुकानातील सामानाची नासधूस केली, तर दारूचे बॉक्स सुद्दा फोडले. इतकच नाही तर दुकान जाळण्याचा सुद्दा प्रयत्न या महिलांनी केला. 20 ते 25 महिलांच्या या घोळक्याने या दुकानाची चांगलीच नासधूस केली. 

गेली काही दिवस हे दारू दुकान बंद करावे, अशी मागणी या महिला करीत होत्या. मात्र त्याला दाद मिळत नव्हती, असा महिलांचा आरोप आहे. दारू दुकानामुळे तरूण मुले सुद्धा वाया जात आहेत, असा महिलांचा आरोप आहे. त्यामुळं तातडीनं हे दुकानं बंद करावं अशी महिलांची मागणी आहे.