राजपूरला चक्रिवादळाचा तडाखा; घरांची पडझड, एका महिलेचा बळी

पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या वादळी वाऱ्याने रत्नागिरीला अक्षरशः झोडपून काढले. या चक्रिवादळानं एक महिला ठार झाली तर तीन लहान मुले जखमी झाली. राजापूर तालुक्यात साडे तीन कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सोमवारी मध्यरात्री सुटलेल्या सोसाट्याच्या वा-यानं काही कालावधीतच होत्याचं नव्हतं केलं. 

Updated: Apr 29, 2015, 10:58 AM IST
राजपूरला चक्रिवादळाचा तडाखा; घरांची पडझड, एका महिलेचा बळी title=

रत्नागिरी : पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या वादळी वाऱ्याने रत्नागिरीला अक्षरशः झोडपून काढले. या चक्रिवादळानं एक महिला ठार झाली तर तीन लहान मुले जखमी झाली. राजापूर तालुक्यात साडे तीन कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सोमवारी मध्यरात्री सुटलेल्या सोसाट्याच्या वा-यानं काही कालावधीतच होत्याचं नव्हतं केलं. 

अनेक ठिकाणी झाडं पडली. घरांचे पत्र उडाले, कौलं फुटली. यामुळे राजापूर परिसरातला वीजपुरवठा खंडीत झाला. यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर लांजा तालुक्यालाही चक्रिवादळाचा फटका बसला. या वादळाने हसोळ, मोरोशी, ताम्हाणे, केळवली, पाचल भागातील शेकडो घरे उद्ध्वस्त झालीत. गावातील विजेचे खांब कोसळून पडले. आंबा, काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. 

गेल्या मार्चमध्ये अवकाळी पाऊस, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गारपीट आता चक्रीवादळ म्हणजे निसर्गाच्या बदलत्या वातावरणाचा हा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. ताम्हाणे, मोसम, मोरोशी, केळवली, तळगाव, कोंडोशी निखारेसह अनेक गावांत अनेक घरे, गोठ्यांवरील कौले, पत्रे उडून गेल्याने १५० पेक्षा अधिक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. 

हसोळ येथे झाड कोसळल्याच्या घटनेत रुखसाना सुलेमान मीर (४०) या महिलाचा मृत्यू झाला. तर त्यांच्याच घरातील तीन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. ताम्हाणे गावात चक्रीवादळाच्या तांडवात ५० ते ६० घरे, तर मोरोशी गावात २५ ते ३० घरे जमीनदोस्त झालीत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.