व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह डीपी लावल्याने अॅडमिन अटकेत

 ग्रुपचा प्रोफाईल फोटो बदलून आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी अॅडमिनवर ही कारवाई करण्यात आली, त्याच्यावर रिसोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 22, 2017, 06:02 PM IST
व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह डीपी लावल्याने अॅडमिन अटकेत title=

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील रिसोडमध्ये  व्हॉटस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक करण्यात आली आहे. ग्रुपचा प्रोफाईल फोटो बदलून आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी अॅडमिनवर ही कारवाई करण्यात आली, त्याच्यावर रिसोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. रिसोडमधील वाकदच्या अॅडमिन हरीश भारत झीजानला अटक करण्यात आली.

अॅडमिनला तात्काळ अटक करण्याचं कारणही तसंच होतं, कारण या प्रकारामुळे वाकद गावात काही तणावाच वातावरण निर्माण झालं होतं. तसेच रिसोड ते मेहकर मार्ग वाकद येथे काही तास बंद ठेवण्यात आला होता.

'ऑल इन वन ग्रुप' हा ग्रुप वाकद येथील आरोपी शाहरुख खा.अलीयार खा.यांनी बनवला होता. आरोपीने या आधीचा फोटो बदलून नवीन प्रोफाईल फोटो बदलला आणि त्याठिकाणी आक्षेपार्ह फोटो टाकला.