बारावीच्या उत्तरपत्रिका तपासायला शिक्षकांचं असहकार

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीबाबत शिक्षकांनी असहकाराचं धोरण पुकारलंय.

Updated: Feb 22, 2017, 05:55 PM IST
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासायला शिक्षकांचं असहकार  title=

पुणे : बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीबाबत शिक्षकांनी असहकाराचं धोरण पुकारलंय. एक शिक्षक दिवसाला एकच उत्तरपत्रिका तपासणार आहे. गेल्या वर्षी मान्य करण्यात आलेल्या मागण्या अजूनही पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत.

त्यामुळेच राज्यातल्या ७२ हजार शिक्षकांनी असहकार आंदोलन पुकारलं आहे. कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदान देण्यात यावं, या आणि इतर मागण्या शिक्षकांनी केल्या आहेत. येत्या २८ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. शिक्षकांच्या या आंदोलनावर तोडगा निघाला नाही तर बारावीचे निकाल रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.