पालघरमधील महिलांनी पाण्यासाठी मंगळसूत्र ठेवलं गहाण

सात जन्मात हाच पती मिळावा यासाठी महिला वटपोर्णिमेचा उपवास करतात. मात्र, पालघरमधील महिलांवर बोअरवेल मारण्यासाठी आपलं मंगळसूत्रचं गहाण ठेवण्याची वेळ आली आहे.

Updated: Jun 2, 2015, 04:55 PM IST
पालघरमधील महिलांनी पाण्यासाठी मंगळसूत्र ठेवलं गहाण   title=

पालघर : सात जन्मात हाच पती मिळावा यासाठी महिला वटपोर्णिमेचा उपवास करतात. मात्र, पालघरमधील महिलांवर बोअरवेल मारण्यासाठी आपलं मंगळसूत्रचं गहाण ठेवण्याची वेळ आली आहे.

जून महिना उजाडला तरी वरुण राजा बरसला नाही. बळीराजा पावसाची चातकासारखी वाट पाहतोय. राज्यात पाणी टंचाईची समस्या सर्वत्र पाहायला मिळतेय. याला डहाणू तालुक्यातलं चिखली गावही अपवाद नाही. ही समस्या दूर करण्यासाठी गावातील रणरागिणी पुढे सरसावल्यात. 

प्रशासनांकडे वांरवांर मागणी करुनही दखल घेतली जात नसल्यानं त्यांना अखेर आपलं सौभाग्य लेणं गहाण ठेवण्याची वेळ आलीये. अधिकारी मात्र, प्रस्ताव पाठवला असून त्याला अंतिम मंजूरी मिळालेली नसल्याचंगुळमुळीत उत्तर देतात, अशी माहिती भारती सुरती यांनी दिली.

बांबूच्या वस्तू तयार करून विकणं हा गावाचा प्रमुख व्यवसाय. हे काम तसं वेळखाऊ आणि कष्टाचं. त्यातच पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, म्हणून गावातल्या महिलांनी मंगळसूत्रं गहाण ठेवून बोअरवेल खणली. आता हे पाणी घरापर्यंत आणण्यासाठी तरी सरकारनं मदत करावी, अशी या महिलांना आशा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.