वांगणीत घराची भिंत कोसळून 2 महिला ठार

बदलापूर आणि वांगणी भागात पडणा-या संततधार पावसामुळे वांगणीमधल्या नवापाडा भागात घराची भिंत कोसळल्याची घटना घडलीय. या अपघातात 2 महिला ठार झाल्या असून 3 जण जखमी झालेत. 

Updated: Aug 4, 2014, 12:16 PM IST
वांगणीत घराची भिंत कोसळून 2 महिला ठार title=

डोंबिवली : बदलापूर आणि वांगणी भागात पडणा-या संततधार पावसामुळे वांगणीमधल्या नवापाडा भागात घराची भिंत कोसळल्याची घटना घडलीय. या अपघातात 2 महिला ठार झाल्या असून 3 जण जखमी झालेत. 

जखमींमध्ये एका 2 वर्षांच्या चिमुरडीचा समावेश आहे. रात्री 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. 

जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलेत. म्हाळसा हातागणे आणि संताबाई सोनवणे अशी मृतांची नावं आहेत तर स्वाती हातागणे, संतोष सकट आणि गणपत सकट हे तिघे जखमी झालेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.