संरक्षक भिंत कोसळली, मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक ठप्प

संरक्षक भिंत पडल्याने ठाणे रेल्वे स्थानकावर जलद मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे ३ आणि ४ फ्लॅटफॉर्मवरील दोन्ही दिशेकडील वाहतूक बंदच आहे. त्यामुळे आधीच उशिरा धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचे अधिक हाल झालेत.

Updated: Jun 21, 2016, 01:10 PM IST
संरक्षक भिंत कोसळली, मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक ठप्प title=

ठाणे : संरक्षक भिंत पडल्याने ठाणे रेल्वे स्थानकावर जलद मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे ३ आणि ४ फ्लॅटफॉर्मवरील दोन्ही दिशेकडील वाहतूक बंदच आहे. त्यामुळे आधीच उशिरा धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचे अधिक हाल झालेत.

उदयनगर येथे पारसिक बोगद्याजवळ रेल्वेच्या संरक्षक भिंतीचा कठडा रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याने ठाणे रेल्वे स्टेशनवर वाहतुकीचा खोळंबा झालाय. दरम्यान, संरक्षक भिंतीचा कठडा कोसळल्याने डोंगराचा भाग खाली घेण्याची भिती व्यक्त होत आहे.

कळवा येथे दरडीचा धोका कायम आहे. त्यामुळे पुन्हा पाऊस सुरु झाल्यास येथे रुळावर माती येण्याचा धोका आहे. दरम्यान, सकाळपासून रेल्वे सेवा विस्कळीत असल्याने प्रवाशांचे अतोनाथ हाल होत आहेत.

  
रेल्वेची सेवा कोलमडली असताना कल्याण आणि ठाणे दरम्यान बस सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आलेय. तर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अतिरिक्त बसेस नवी मुंबई, ठाण्याच्या दिशेने, तर ठाण्याच्या बसेस नवी मुंबई आणि कल्याणच्या दिशेनं सोडणार असल्याचंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलंय.