औरंगाबादमध्ये चार नगरपालिकांसाठी मतदानाला सुरुवात

औरंगाबाद जिल्ह्यातील चार नगरपालिकांसाठी मतदानाला सुरुवात झालीये. यात कन्नड, पैठण, गंगापूर आणि खुलताबाद या नगरपालिकांचा समावेश आहे. तर वैजापूर नगरपालिकेची निवडणूक कोर्टाच्या आदेशानं लांबणीवर पडलीय. 

Updated: Dec 18, 2016, 08:41 AM IST
औरंगाबादमध्ये चार नगरपालिकांसाठी मतदानाला सुरुवात  title=

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील चार नगरपालिकांसाठी मतदानाला सुरुवात झालीये. यात कन्नड, पैठण, गंगापूर आणि खुलताबाद या नगरपालिकांचा समावेश आहे. तर वैजापूर नगरपालिकेची निवडणूक कोर्टाच्या आदेशानं लांबणीवर पडलीय. 

कन्नड नगरपालिकेवर सध्या कॉंग्रेसची सत्ता आहे. इथं कॉंग्रेस आणि शिवसेनेत लढत असली तरी, शिवसेनेत असूनही हर्षवर्धन जाधव यांनी स्वतंत्र रायभान आघाडी तयार केलीय. त्यामुळं मोठी चुरस निर्माण झालीय. पैठण नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा आहे. 

पळवापळवीचे राजकारण, सर्वच पक्षांनी लावलेली ताकद आणि बड्या नेत्यांच्या झालेल्या सभांमुळे ही निवडणूक महत्वाची मानली जातेय. तर गंगापूरची नगरपालिका कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. 

आमदार प्रशांत बंब यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. त्यामुळं संजय जाधव यांना ही निवडणूक सोपी नसल्याची चर्चा आहे. खुलताबाद नगरपालिकेवर आमदार बंब यांचं वर्चस्व आहे. इथं मुख्य लढत भाजप आणि कॉंग्रेसमध्ये असणार आहे.