अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या 'त्या' दोन पोलिसांवर कारवाई

कल्याण पोलीस परिमंडल ३ च्या अंतर्गत ज्या दोन पोलीस कर्मचा-यांनी आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध प्रसार माध्यमासमोर आपली व्यथा मांडली होती. त्या पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. 

Updated: May 9, 2015, 07:44 AM IST
अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या 'त्या' दोन पोलिसांवर कारवाई  title=

ठाणे : कल्याण पोलीस परिमंडल ३ च्या अंतर्गत ज्या दोन पोलीस कर्मचा-यांनी आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध प्रसार माध्यमासमोर आपली व्यथा मांडली होती. त्या पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. 

पोलीस क़ायदा१९६६ कलम ३(१) क ४ या अंतर्गत व् सह पोलीस कायदा १९२२ चे कलम ३ प्रमाणे पोलीस कर्मचारी जितेंद्र निकम, राजन कर्डक यांचा विरुद्ध मानपाडा पोलीस स्टेशन  गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी रणदिवे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या वरिष्ठांसमोर मांडल्या पाहिजेत मात्र या समस्या त्यांनी प्रसार माध्यमासमोर मांडून नियम बाह्य काम केल्याचे वरिष्ठांचे म्हणणे आहे. या प्रकरणी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी कल्याण न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे तर मानपाडा पोलीस ठाण्यातील आरोपी असलेले पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.